आपल्या बछड्यासाठी ‘ती’चा पिंजर्‍यावरच ठिय्या

August 11, 2016 6:04 PM0 commentsViews:

पुणे, 11 ऑगस्ट : आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी आई जगाशी दोन हात करण्यात मागे पुढे पाहत नाही. आपल्या बछड्याला सोडवण्यासाठी ती शक्य ते सारं काही करते…अशाच एका आईची तडफड पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुकच्या भोकरवाडीत पाहायला मिळालीये. हे बाळ म्हणजे दीड ते दोन वर्षांचा नर बिबट्याचा बछडा होता.junar_bibty4

बुधवारी रात्री 9.30 वाजता वनअधिकार्‍यांनी लावलेल्या पिंजर्‍यात एक बिबट्याचा बछडा अडकला. काही वेळात त्याची आई तिथे आली आणि डरकाळ्या फोडायला लागली. पिंजर्‍यांवर बसून ती आवाज करू लागली आणि आपल्या पिलाला सोडण्यासाठी तिच्या जीवाची तडफड सुरू झाली. ग्रामस्थांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमला कळवलं. रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत या आईची ही तडफड सुरुच राहिली. अखेर ही मादी बाजूला गेल्यावर पहाटे 3 वाजता वनअधिकार्‍यांना बछड्याला निवारा केंद्रात नेलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close