‘तो’ जखमेनं व्हिवळत होता,पण मदत तर दूरच मोबाईलही चोरून नेला

August 11, 2016 6:54 PM1 commentViews:

11 ऑगस्ट : वेगवान जीवनशैलीच्या नादात आपण सगळेच किती भावनाशून्य आणि संधिसाधू झालो आहोत याचं ढळढळीत उदाहरण दिल्लीत समोर आलं. दिल्लीच्या रस्त्यावर चालणार्‍या एका माणसाला एका टेंपोने उडवलं. टेंपोचा ड्रायव्हर टेंपोतून खाली उतरला खरा. पण फुटपाथवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या माणसाला पाहत हे प्रकरण गंभीर आहे हे ताडून त्याने लगेच तिथून पळ काढला.

delhi_accidentथोड्या वेळाने एक हातरिक्षावाला या जखमी माणसाजवळ येऊन थांबला. पण मदत करायचं सोडून या हातरिक्षावाल्याने त्याचा मोबाईल उचलला आणि धूम ठोकली. यानंतर एक तास हा जखमी माणूस तसाच रस्त्यावर पडून होता. शेवटी स्थानिकांनी पोलिसांना खबर दिली आणि या माणसाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • sachin aherkar

    —-कलियुगातील रामराज्य अवतरले आहे. त्यात संवेदना शुन्य माणसांनाच जीवंत राहण्यासाठी अधिकार आहे. जंगल कायद्या प्रमाणे एकाच्या मरणात दुसऱ्याचे जीवन हा कायदा लागू होतो. कायद्या प्रमाणे मरणाऱ्यांच्या कुटुंबीयां देखिल मरण यातना भोगायच्या बाकी आहे. शेवटी जाणार घेला मारणांरा देखिल सुटेल समाज तसाच संवेदना शुन्य होऊन पुढे जात राहिल.

close