सर्पमित्र की सर्पशत्रू ?, सापाचं तोंडंच शिवलं

August 11, 2016 7:06 PM0 commentsViews:

11 ऑगस्ट : तथाकथित सर्पमित्रांचा प्रताप दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये कॅमेर्‍यात कैद झालाय. पिंपरीच चक्क सापाचं तोंडंच शिवलं. तर सोलापुरात धामीण सापाच्या धोंद युद्धात अडथळा आणला. त्यामुळे वनविभाग अशा उपद्‌व्यापी सर्पमित्रांवर कारवाई का करत नाही, असा सवाल विचारला जातोय.snek_news

धामण सर्पामध्ये मादीला मिळवण्यासाठी नर सर्पामध्ये धोंद युद्ध केले जाते. यामध्ये दोन नर धामण सर्प एकामेकाला वेटोळे घालून सर्वाधिक उंच झेप घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये जो नर धामण सर्प कोणत्याही आधाराशिवाय सर्वाधिक उंच झेप घेतो त्यालाच मादी धामणशी प्रणयाची संधी मिळते. सोलापुरात मात्र, मिलनापूर्वीचं हे धोंद युद्ध ऐन रंगात आलं असतानाच काही अतिउस्ताही सर्पमित्रं तिथं आले आणि त्यांनी या सापांना पकडून नेलं. सर्पमित्रांच्या या कृत्याविरोधात सर्पप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close