भुजबळांना ईडीचा दणका, 90 कोटींची मालमत्ता जप्त

August 11, 2016 7:16 PM0 commentsViews:

bhujbal_arrested11 ऑगस्ट : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आज ईडीने आणखी एक दणका दिलाय. ईडीने भुजबळ यांची 90 कोटींची मालमत्ता सील केली आहे अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलीये.

छगन भुजबळ यांच्या वेगवेगळ्या अशा 22 मालमत्ता सील करण्यात आल्या आहे. याची किंमत 90 कोटींच्या घरात आहे. लवकरच काही दिवसांत भुजबळांच्या मुंबई आणि नाशिकमधील घरांचा आणि इतर मालमत्तेनाही सील केलं जाईल अशी माहितीही किरीट सोमय्यांनी दिली.

याआधीही भुजबळ कुटुंबीयांच्या आर्मस्ट्राँग या कंपनीच्या मालकीचा असलेला गिरणा साखर कारखाना आणि 290 एकर जागा अशी एकूण 55 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. मालेगावमधल्या कसमादे पट्‌ट्यातल्या दाभाडी शिवारात हा कारखाना आहे. 1997 मध्ये भुजबळ कुंटुंबाच्या मालकीची असलेल्या आर्मस्ट्राँग कंपनीनं अवघ्या 28.5 कोटींत घेतला होता. पण, कारखाना खरेदीसाठी पैशांचा स्रोत भुजबळांनी सांगितला नव्हता. बाजारभावाप्रमाणे 150 कोटी रुपये किंमत असलेला कारखाना फक्त 28.5 कोटींमध्ये विकत घेण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close