एक ‘महाड दुर्घटना’ टळली

August 11, 2016 7:34 PM0 commentsViews:

..

नंदुरबारच्या नवापूरमध्ये महाडसारखी दुर्घटना होता होता टळली. नवापूरच्या रंगावली नदीत बस वाहून जाताना वाचली. ही बस सूरतहून जालन्याकडे येत होती. रंगावली नदीच्या पुलावर बस असताना अचानक पुराच्या पाण्याचा लोंढा आला. त्या लोंढ्यात बस वाहून जाऊ लागली होती. पण स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखत एसटी बसला जेसीबीनं धरुन ठेवलं. शिवाय बसमध्ये अडकलेल्या 17 प्रवाशांची सुटका केली. गावकर्‍यांनी प्रसंगावधान राखलं नसतं तर ही बस वाहून गेली असती. दरम्यान, नवापूर बस दुर्घटना प्रकरणातील बसचालक राजेंद्र साबळे यांना बेजबाबदारपणे वाहन चालविल्या प्रकरणी निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close