रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्समध्ये सामना

April 12, 2010 12:48 PM0 commentsViews: 1

12 एप्रिलआयपीएलमध्ये आज बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्स आमने सामने येत आहेत. दोन्ही टीम जबरदस्त फॉर्मात असून दोन्ही टीमची ही बारावी मॅच आहे. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने गेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत पराभव करत पॉईंट टेबलमध्ये थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. टीमची प्रमुख मदार आहे ती भक्कम बॅटिंगवर. जॅक कॅलिस, रॉस टेलर, रॉबिन उत्थप्पा मॅच विनर बॅट्समन ठरत आहेत. तर राहुल द्रविडलाही पुन्हा सूर सापडला आहे. दुसरीकडे डेक्कन चार्जर्स टीमने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केले आहे. पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या डेक्कनने शेवटच्या टप्प्यात सलग दोन विजय मिळवत पुन्हा सेमीफायनलच्या शर्यतीत झेप घेतली आहे. बंगलोरविरुध्द झालेल्या या आधीच्या मॅचमध्येही डेक्कनने विजय मिळवला होता. त्यामुळे विजयाची पुनरावृत्ती करण्याचा डेक्कनचा प्रयत्न असेल.

close