मुंबई इंडियन्स सेमीफायनलमध्ये

April 12, 2010 1:00 PM0 commentsViews: 6

12 एप्रिलआयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुध्दची मॅच जिंकत मुंबई इंडियन्सने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. राजस्थान रॉयल्सविरुध्दच्या या विजयाचा हिरो होता तो कॅप्टन सचिन तेंडुलकर. या मॅचचे वर्णन सबकुछ सचिन असेच करावे लागेल. सचिनने अवघ्या 59 बॉलमध्ये नॉटआऊट 89 रन्सची कॅप्टन इनिंग केली.एका बाजूला झटपट विकेट जात असताना सचिनने मात्र मैदानावर भक्कमपणे उभे राहत टीमला बलाढ्य स्कोअर उभा करून दिला. आयपीएलमध्ये सर्वाधिर रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीतही सचिन अव्वल क्रमांकावर पोहचला आहे.त्याने ऑरेंज कॅपही पटकावली आहे. 11 मॅचमध्ये सचिनच्या नावावर आता तब्बल 512 रन्स जमा झालेत. यात त्याने 5 हाफसेंच्युरीही केल्यात. इतकेच नाही तर आयपीएलच्या तिनही हंगामात मिळून सचिनने हजार रन्सचा टप्पाही पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा बॅट्समन ठरला आहे.

close