मंत्रालयाचे मेकओव्हर नाही

April 12, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

12 एप्रिलमुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीला आता मेकओव्हरमधून वगळले जाणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली. तसेच आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले या संदर्भात पुन्हा निविदा मागवण्यासाठी पायभूत सुविधा समितीपुढे आग्रह धरणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. सरकारने नरिमन पॉईंट परिसरात मेकओव्हर प्लॅन आखला आहे. या मेकओव्हरवरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भुजबळ यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. तसेच विरोधकांनी जोरदार टीका केल्याने सरकारने आता मंत्रालयाचे मेकओव्हर न करण्याचा पवित्रा घेतला आहे.

close