दोन एसटी बसची टक्कर, 1 ठार, 20 जखमी

August 12, 2016 11:49 AM0 commentsViews:

vlcsnap-2016-08-12-12h55m39s175

राजापूर – 12 ऑगस्ट :  राजापूरजवळ आज (शुक्रवारी) दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 1 वृद्ध महिला ठार, तर 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ असलेल्या हातिवले गावात आज सकाळीच हा अपघात घडला. हातिवले कॉलेजला जाणारी एसटी आणि जुवाटी-राजापूर एसटी बसमध्ये जोरदार धडक झाली. चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांनी त्याबाबत तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. दोन्ही गाड्या हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close