बदलापूर रेल रोकोमध्ये असामाजिक तत्वांचा सहभाग ?

August 12, 2016 4:28 PM0 commentsViews:

12 ऑगस्ट : बदलापूरच्या रेल्वे आंदोलनात असामाजिक तत्वांचा सहभाग होता असा आरोप मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी केलाय. बदलापुरातील आंदोलनानंतर त्यांनी बदलापूर स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनात असामाजित तत्वांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

badalapur_rail_roko (6)असामाजित तत्वांच्या सहभागामुळे हे आंदोलन जास्त चिघळल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलक दोन-तीन गटांमध्ये होते त्यांच्या मागण्याही वेगवेगळ्या होत्या. त्या सगळ्यांना आश्वासनांची पत्रं द्यावी लागली. लोकलच्या प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात 19 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र आंदोलनात असामाजिक तत्व असल्याचं सांगत आंदोलनाला बदनाम करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

दरम्यान, बदलापूरमध्ये सकाळी साडेपाचपासून सुरू असलेलं प्रवाशांचं आंदोलन संपलंय. तब्बल 6 तासांनी म्हणजेच 10 वाजून 55 मिमिटांनी संपलं. सकाळी अकराच्या सुमारास बदलापूरहून मुंबईकडे आणि कर्जतकडे पहिली लोकल सोडण्यात आली. कल्याण आणि भिवपुरी स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे जाणार्‍या गाड्यांची गती मंदावली होती. त्यामुळे बदलापूर स्टेशनवर काही प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले. नंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. प्रवाशांनी तब्बल सहा तास मध्य रेल्वेची वाहतूक प्रवाशांनी रोखून धरली होती. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणं विस्कळीत झालं होतं. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही लोकल गाड्यांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close