युलिपवरची बंदी उठवली

April 12, 2010 2:56 PM0 commentsViews: 6

12 एप्रिल सेबीने 14 इन्शुरन्स कंपन्यांच्या युलिप योजनांवरची बंदी उठवली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर आयआरडीए आणि सेबीने हा निर्णय मान्य केला. याआधी खासगी इन्शुन्स कंपन्यांनी शेअरबाजाराशी संबंधीत उत्पादने विकण्यापूर्वी योग्य परवानगी न घेतल्याने सेबीने ही बंदी घातली होती. यात अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी आयआरडीएसोबतच सेबीचीही परवानगी घेणे गरजेचे आहे, अशी सेबीने भूमिका घेतली होती. यामुळे या दोन्ही सरकारी नियंत्रण कंपन्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते.सेबी शेअर मार्केटच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवते. तर आयआरडीए सरकारतर्फे विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. युलिप योजनांवरील बंदी उठवल्यामुळे लाखो गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

close