वाळू माफियांनी उपसरपंचाला चिरडले

April 12, 2010 5:30 PM0 commentsViews: 6

हरिष दिमोटे, शिर्डी12 एप्रिलवाळू माफियांनी राहुरी तालुक्यातील माणोरीच्या उपसरपंचाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच उपसरपंचाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.राहुरी तालुक्यातील माणोरी गावातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होते. पण त्या वाहतुकीला विरोध करणार्‍या उपसरपंच चांगदेव पोटे यांनाच ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्यात आले. राहुरी तालुक्यातून वाहत असलेल्या मुळा नदीच्या पात्रातून बेकादेशीरपणे बेसुमार वाळू उपसा होतो. महसूल विभाग आणि पोलिसांनीही या तस्करांना अभय दिल्याने त्यांना कुणाचीही भीती राहिली नाही. त्यामुळं पैसे कमावण्यासाठी ते कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत.पोटे खूनप्रकरणी पोलिसांनी रुपेश तनपुरे या आरोपीला अटक केली आहे.तहसिलदार, पोलीस आणि गावकरी यांना मारण्याच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. तरीही वाळू तस्करी राजरोसपणे सुरू आहे. वाळू तस्करांवर लवकरच पायबंद घातला नाही, तर अशा घटना वाढतच राहतील, अशी भीती गावकरी व्यक्त करत आहेत.

close