संयमाचा ‘पूल’ तुटला, श्रद्धांजली वाहून नातेवाईक परतीच्या वाटेवर

August 12, 2016 6:11 PM0 commentsViews:

महाड, 12 ऑगस्ट : सावित्री नदीत वाहून गेलेल्या आपल्या आप्तेष्टांचे मृतदेह तरी मिळेल या आशेनं गेल्या 10 दिवसांपासून धीर धरून असलेल्या नातेवाईकांच्या संयमाचा बांध आता फुटलाय. हताश मनाने नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण करून महाडचा निरोप घेतलाय.

mahad_shradhanjali4पोलादपूर आणि महाड दरम्यान सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यामुळे 2 एसटी बसेस आणि एक तवेरा गाडी वाहून गेलीये. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. राज्य सरकारने जाहीर केल्यामुळे 42 जण या दुर्घटनेत बेपत्ता असल्यांचं सांगण्यात आलंय. पण अजूनही 16 जणांचे मृतदेह मिळू शकले नाही. शेवटचा मृतदेह मिळेपर्यंत शोधकार्य सुरू राहिली अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण, निसर्गाशी दोन हात करण्याची ताकद इथे अपुरी पडलीये.

गेल्या चार दिवसांत एकही मृतदेह हाती लागला नाही. मृतदेह न मिळालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मृतदेह मिळण्याची आशा आता सोडून दिलीये. त्यामुळे मृतदेह मिळण्याची वाट न पहाता त्यांनी हताश मनाने तिथेच आपल्या आप्तेष्टांना श्रद्धांजली अर्पण करून माघारी फिरण्याचा निर्णय घेतलाय.

आपल्या आप्तेष्टांचा अखेरचं दर्शन तरी घेता यावं या आशेपोटी गेले दहा दिवस ते महाडमध्येच राहत होते. मात्र, आता सारी आशा मावळल्यामुळे जड अंतकरणाने त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतलाय. आज सकाळपासून नातेवाईकांनी परतीची वाट धरलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close