डॉनल्ड ट्रंप यांची वाचाळगिरी, ओबामांची तुलना थेट आयसिसच्या संस्थापकाशी !

August 12, 2016 6:40 PM0 commentsViews:

11 ऑगस्ट : अमेरिकन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रंप विचित्र वक्तव्यं करतात ही आता बहुधा बातमीही राहिली नाहीये. पण कसं माहीत नाही,ते आपल्या तर्कशून्य विधानांचा दर्जा सातत्याने उंचावत राहतात. आता यावेळी त्यांनी अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची संभावना ‘आयसिसचे संस्थापक’ अशी केली आहे.

trump_vs_obamaबराक ओबामांनी इराकमधून अमेरिकन सैन्य मागे घेतल्याने आयसिसचा उदय झाला असा आरोप ट्रंप यांनी केलाय. प्रत्यक्षात इराकमधली तत्कालीन प्रस्थापित सत्ताकेंद्र एका गरज नसलेल्या युद्धाद्वारे नष्ट करण्याचं आणि आयसिसच्या उदयाला पोषक परिस्थिती तयार करण्याचं काम ट्रंप यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज बुश यांनी केलंय याचा ट्रंप यांना सोयीस्कर विसर पडलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा