पतीराजांना आवारा नाहीतर अपात्रतेची कारवाई करू, आयुक्तांची नगरसेविकांना तंबी

August 12, 2016 9:44 PM0 commentsViews:

aurangabadऔरंगाबाद, 12 ऑगस्ट : माझी पत्नी नगरसेवक आहे असं म्हणून अधिकार्‍यांवर दबाव आणणार्‍या पतीराजांना औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय. ज्या महिला नगरसेवक आहेत त्यांचे पती महापालिकेच्या मुख्यालयाच्या आत आढळते तर महिला नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई करू असा इशारा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला आहे.

महिला लोकप्रतिनिधी असल्या तरी त्यांचे पतीच पुढ असतात. काही ठिकाणी महिला नगरसेवकाचा पती स्वत:लाच नगरसेवक म्हणून मिरवतो..आणि अधिकार्‍यांवर दबाव टाकतो. तर काही जणांनी स्वताच नगरसेवक म्हणून व्हिसिटिंग कार्ड सुद्धा बनवून घेतले आहेत.

मात्र औरंगाबादेत महापालिका आयुक्तांनी असल्या पतींना जरब बसवण्याचा विडाच उचलला आहे. ज्या महिला नगरसेवक आहेत त्यांचे पती महापालिकेच्या मुख्यालयाच्या आत आढळते तर महिला नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई करू असा इशारा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला आहे.

महिला नगरसेविकेच्या नावानं पती भाऊ दिर यांनी अधिकार्‍यांना त्रास दिला तर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करू अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे. मात्र महिला नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक रूप धारण करीत आयुक्तांची आणि महापौर यांची कोंडी कऱण्याचा प्रयत्न केला.मात्र आयुक्त बकोरिया आपल्या निर्णयावर ठाम आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close