पाणीपुरवठ्याच्या 60 टक्के योजना बंद

April 12, 2010 5:39 PM0 commentsViews: 5

12 एप्रिलराज्यातील 85 हजारांपैकी 25 हजार खेडी आणि वस्त्यांमध्ये 16 हजार कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबवण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. पण पाणी पुरवठ्याच्या 851 पैकी 60 टक्के योजना बंद आहेत, अशी कबुली पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी विधानसभेत दिली. तथापी थकित पाणीबिलापोटी स्थानिक स्वराज्यसंस्थाकडे महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे 3 हजार 245 कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळे या थकित बिलाची वसुली होत नसेल तर ही थकबाकी माफ करण्यासंबधी तीन महिन्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत तोडगा काढण्यात येईल, असही ढोबळे यांनी स्पष्ट केले.

close