संतापजनक !, विक्रोळीत अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

August 13, 2016 12:56 PM0 commentsViews:

rape_case_mumbaiमुंबई, 13 ऑगस्ट : मुंबईतील विक्रोळी भागात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणी दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी जे.जे. हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

विक्रोळी पार्कसाईट परिसरात शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडलीये. या घटनेनंतर नागरिक तीव्र संताप व्यक्त केलाय. आज पार्कसाईट परिसरात उत्स्फुर्त बंद पुकारलाय. या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये कलम 363 , 376 पोस्को अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close