औरंगाबादेत 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर

August 13, 2016 1:25 PM0 commentsViews:

abad_108औरंगाबाद, 13 ऑगस्ट : जिल्ह्यात प्रशासन आणि डॉक्टरांनी कहर केलाय. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी आज संपावर गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या 30 रुग्णवाहिका आज जागेवर उभ्या आहेत.

पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला आहे. त्यांनी आधी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिलं होतं. हे सगळं जरी असलं तरी रुग्णवाहिकेसारखी अत्यावश्यक सेवा दिवसभर बंद राहणार, हे अतिशय वाईट आहे. रुग्णांनी करायचं काय? जर एखादी मोठी दुर्घटना घडली, तर या रुग्णवाहिका चालवणार कोण? आणि रुग्णवाहिकेत रुग्णांवर उपचार कोण करणार? असे प्रश्न निर्माण झाले आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

- रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी संपावर जाणं किती योग्य?
- मागण्या रास्त असल्या तर जबाबदारी अशी झटकायची का?
- मोठी दुर्घटना झाली तर काय करायचं?
- निवेदन देऊनही प्रश्न सुटला का नाही?
- सरकार नेहमीच संपाची वाट का पाहतं?
- निष्पाप रुग्णांनी काय करायचं?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close