पिंपरी चिंचवडसाठी लवकरच स्वतंत्र्य पोलीस आयुक्तालय ?

August 13, 2016 4:57 PM0 commentsViews:

13 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी पाहता लवकरच स्वतंत्र्य पोलीस आयुक्तालय उभारण्यात येण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट म्हणजे सोमवारी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

pimperi_chinchvadपिंपरी-चिंचवड शहरासाठी होणार आयुक्तालय कसं असेल आणि या आयुक्तालयाच्या अंतर्गत किती पोलीस स्टेशन जोडण्यात येणार आहेत. याबाबचा प्रस्तावित नकाशाही व्हायरल झाला आहे. मात्र नवीन आयुक्ताल स्थापन केले जाणार की नाही याचा दुजोरा पोलिसांनी अजून दिलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी बघता शहरात स्वतंत्र्य आयुक्तालय स्थापन करण्यात यावं अशी मागणी 10 वर्षांपासून करण्यात येत होती.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात 8 पोलीस स्टेशन्स आणि परिमंडळ-3च्या अंतर्गत 20 लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 1500 पोलीस कर्मचारी आहे. जर पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्तालय झाल्यास 18 पोलीस स्टेशन्स होणार आहे. ज्या मध्ये पिंपरी- चिंचवड, निगडी, सांगवी, भोसरी, वाकड, हिंजवडी, भोसरी एमआयडीसी आणि चतु:शृंगी यांचा नव्याने समावेश होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close