मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा !

August 13, 2016 6:19 PM0 commentsViews:

mumbai_pune_express13 ऑगस्ट : तीन दिवसांचा लाँग विकेण्ड पाहून घराबाहेर पडलेल्या मुंबई आणि पुण्याच्या लोकांना एक्स्प्रेस हायवेवर अभुतपूर्व वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. मुसळधार पाऊस आणि धुक्याची शाल लपेटलेल्या लोणावळ्यात विकेण्ड साजरा करण्यासाठी येणार्‍या लोकांची परवड या वाहतूक कोंडीपासूनच सुरू झालीये.

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर मुंबई कडून पुण्याकड़े येताना वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असा लाँग विकेण्ड असल्यामुळे मुंबईहून लोणावळयाकडे येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. एक्सप्रेस वे वाहतूक सध्या संथ गतीने सुरूआहे. खाजगी वाहनांनी रस्ता अडवून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडलीये. अशात ही कोंडी लवकर सुटेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close