किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी

August 13, 2016 7:41 PM0 commentsViews:

hiranadani_hospital33313 ऑगस्ट : मुंबईतल्या हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किडनी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी यांचाही समावेश आहे.

उच्चभ्रु हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेडचा पर्दाफाश झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी 5 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. यात एका सीईओचाही समावेश आहे. आज या पाचही डॉक्टरांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या पाचही डॉक्टरांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की, यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाहीये. पोलिसांच्या हक्कांमध्ये हे बसत असलं तरी इतक्या गंभीर प्रकरणात पोलीस कोठडी मागितली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close