शहापूरमध्ये ऑईल मिलला आग

April 13, 2010 9:05 AM0 commentsViews: 2

13 एप्रिलठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये लिबर्टी ऑईल मिल कंपनीला लागलेली भीषण आग अजूनही विझलेली नाही. ही आग विझवण्यासाठी पुण्यावरून सीआरपीएफची आपत्ती व्यवस्थापन टीम शहापुरात दाखल झाली आहे. टीममधील 45 जवानांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगीपासून जवळच 12 हजार टनाचे तीन ऑईल टँक आहेत. तिथपर्यंत आग पोहोचू नये म्हणून हे जवान प्रयत्न करत आहेत. तर गेल्या 12 तासांपासून आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने कवडास, बामणे ही दोन गावे रिकामी केली आहेत. सकाळी आग लागल्यानंतर 8 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.मुरबाड-शहापूर मार्गावरील वाहतूकही सकाळपासून दुसर्‍या मार्गावर वळवण्यात आली आहे.

close