मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी

August 14, 2016 3:06 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-08-14-15h09m40s232

14 ऑगस्ट :  ऐन रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ दोन अवजड वाहने बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. या दोन वाहनांच्या बंद पडण्यामुळे इतर प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाणारी दोन अवजड वाहने अमृतांजन पुलाजवळ अचानक बंद पडली. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱया वाहनांच्या सुमारे 5 किलोमीटरवर रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आज पुन्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, यावर उपाय म्हणून बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करुन एका लेनची वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सलग आलेल्या सुट्‌ट्यांचा काळ पाहता शनिवारपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या झालेली वाहतूक कोंडी आणि वाहनांची गर्दी पाहता मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक पुर्ववत होण्यासाठी अणखी काही वेळ लागणार असेच चित्र दिसत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close