मुंबईत विधानभवनाबाहेरही आठवडी बाजार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

August 14, 2016 1:29 PM0 commentsViews:

CpzWgxiUEAQFmT_

मुंबई – 14 ऑगस्ट : मुंबईत विधानभवनाच्या बाहेर शेतकरी आठवडी बाजाराचं आज (रविवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. शेतकर्‍यांना आपला शेतमाल थेट खुल्या बाजारात विकता यावा, यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.


यापूर्वी पुण्यातही अशा पद्धतीचा शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्यात आला होता. मुंबईत दर रविवारी हा बाजार भरवला जाणार आहे. तसंच पुढच्या काळात ज्या-ज्या ठिकाणी सरकारच्या जागा उपलब्ध आहेत, त्या-त्या ठिकाणी सरकार शेतकरी आठवडी बाजारासाठी जागा देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी या शेतकरी आठवडी बाजारातून कारले, भोपळा आणि टोमॅटोचीही खरेदी केली. महत्त्वाचं म्हणजे या आठवडी बाजारामुळे शेतकर्‍यांच्या हाती थेट मोबदला मिळणार आहे. तसंच व्यापारी आणि तत्सम साखळीमध्ये नसल्यानं ग्राहक आणि शेतकरी दोघांना याचा फायदा होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close