#रिओअपडेट्स : 23वं सुवर्णपदक जिंकून फेल्प्सचा अलविदा

August 14, 2016 4:07 PM0 commentsViews:

phelps14 ऑगस्ट :   सध्या सुरु असणार्‍या रिओ ऑलिम्पिक खेळांमध्ये जलतरणपटू मायकल फेल्प्स याने त्याला साजेशी कामगिरी करत 23व्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. फेल्प्स आणि सुवर्णपदक हे आता काही नवीन समीकरण नसले तरीही हे पदक फेल्प्ससाठी खास ठरणार आहे. मायकल फेल्प्सने 4X100 मेडले रिले प्रकारात सुवर्णपदक मिळवत आपल्या कारकिदच्चा समारोप केला आहे.

मायकल फेल्पच्या कारकिदच्तील ऑलिम्पिकमधले हे 28वं पदक असून त्यात तब्बल 23 सुवर्णपदकांचा समावेश आहे. रिओ 2016 मध्ये हे मायकल फेल्प्सचे पाचवे सुवर्णपदक आहे. ऑलिम्पिक खेळांचा हा महाकुंभ सुरु झाल्यापासूनच अनेकांचे लक्ष मायकल फेल्प्सच्या कामगिरीकडेच लागून राहिले होते आणि फेल्प्सनेही त्याच्या चाहत्यांची निराशा केली नाही असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, अमेरिकेच्या संघाने 4 बाय 100 मेडले रिले प्रकारात तीन मिनिटे आणि 27.95 सेकंदाची वेळ नोंदवून नवा ऑलिम्पिक विक्रमही रचला. त्यामुळे जलतरण क्षेत्रातील अनेकांचा आदर्श असणार्‍या मायकल फेल्प्सवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close