पाकिस्तानचे दुटप्पी धोरण; पुंछमध्ये गोळीबार

August 14, 2016 8:06 PM0 commentsViews:

pakistan ceasefire voilation

14 ऑगस्ट :   पाकिस्तानने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पुंछमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून जोरदार गोळीबार केला. शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने पुंछमध्ये दोन ठिकाणी गोळीबार केला तसेच मोर्टारचा मारा केला. एकीकडे हा गोळीबार सुरू असतानाच पाकिस्तानकडून वाघा सीमेवर बीएसएफच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्यात आले. ‘आझादी का जश्न’ म्हणून पाकच्या वतीने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मिठाई वाटण्यात आली.

स्वतःच्या स्वातंत्र्यदिनी पाकने गोळीबार केल्याचा वृत्ताला भारताच्या संरक्षण प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पहाटे 3 वाजल्यापासून पाकिस्तान स्वयंचलित मशिनगनमधून गोळीबार करत असल्याचे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. पाकच्या हल्ल्यात भारताचे आतापर्यंत नुकसान झालेले नाही, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close