गणवेशावरुन शिक्षिका रागावल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या

August 14, 2016 8:20 PM0 commentsViews:

Sandya

14 ऑगस्ट :  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गरिबीचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. गणवेशावरुन शिक्षिका रागावल्यानं आठवीतल्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. 13 वर्षी संध्या सोनकांबळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून, या प्रकरणी शाळेच्या शिक्षिकेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत मुलगी नांदेडच्या विवेकवर्धिनी शाळेत शिकत होती. ही विद्यार्थिनी गणवेशात न गेल्यानं शिक्षिका तिच्यावर रागवल्या. हा अपमान जिव्हारी लागल्यामुळं संध्यानं गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान, या प्रकरणी संध्याच्या कुटुंबीयांनी शिक्षिका पिंगळकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close