युपीए सरकारवर मायावतींचा घणाघात

October 15, 2008 12:07 PM0 commentsViews: 6

15 ऑक्टोंबर, उत्तर प्रदेशयुपीए सरकार उत्तरप्रदेशाला सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे. मायावती यांनी आज लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली. उत्तरप्रदेशाच्या वाट्याचा पैसा केंद्रानं परस्पर लाटल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रायबरेलीतल्या रेल्वे कोच फॅक्टरीमुळे फक्त लोकांना रोजगार मिळाला असता. शेतकर्‍यांचा प्रश्न मात्र सुटला नसता, असं मायावतींनी म्हटलं. लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळेच काँग्रेसला रायबरेलीची आठवण झाल्याचं त्या म्हणाल्या. काँग्रेससाठी रायबरेली म्हणजेच संपूर्ण राज्य असल्याचं त्या म्हणाल्या. बेरोजगारी असणार्‍या प्रदेशात फॅक्टरी आणल्यास त्यांना रायबरेलीत जागा देऊ. मात्र रॅली घ्यायला आपण रोखलं नसल्याचा दावा त्यांनी केला.अमेठीत फक्त काँग्रेसच्या नेत्यांचांच विकास झाल्याचा आरोप त्यांनी केला.

close