स्वातंत्र्यदिनी मुंबईत हाय अलर्ट

August 15, 2016 9:47 AM0 commentsViews:

34 mumbai police15 ऑगस्ट : मुंबईसह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहरात येणार्‍या आणि जाणार्‍या वाहनांची कसून चौकशी करण्यात येतीये.

परभणीतून आयसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या तरूणांना अटक केल्यानंतर पोलीस जास्त सतर्क झाले आहे. त्यासोबतच 26 नोव्हेंबर प्रमाणेच व्यापारी जहाजातून शस्त्रास्त्र आणून मुंबईत घातपात घडवण्याची शक्यता असल्याचा अलर्ट मिळाल्यामुळेही मुंबई शहर हाय अलर्टवर आहे. स्वातंत्र्यदिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आणि सुरक्षा यंत्रणेत कोणतीही कसूर होऊ नये म्हणून पोलिस दल विशेष प्रयत्नशील आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close