शौर्यपदकासाठी गडचिरोलीतील दहा जिगरबाज पोलिसांची नाव निश्चित

August 15, 2016 10:42 AM0 commentsViews:

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या शौर्य पदकांमध्ये माओवाद्यांविरोधात जीवाची बाजी लावणार्‍या गडचिरोली पोलीस दलातल्या दहा जणांना शौर्य पदक जाहीर झालंय.एक पोलीस निरिक्षक आणि दहा हवालदारांचा यात समावेश आहे.

gadchiroli4दोन एनकाऊंटरमध्ये जीवाची बाजी लावून माओवाद्यांशी या जवानांनी दोन हात केले होते. एटापल्ली तालुक्यातील कसुरवाही जंगलात झालेली चकमकीची घटना, तसंच 12 ऑगस्ट 2014 ला खोब्रामेढाच्या जंगलात झालेल्या चकमकीत या पोलिसांनी जीवाची बाजी लावून माओवाद्यांचा हल्ला परतावून लावला होता. तर तीन माओवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचं नाव शौर्यपदकासाठी निश्चित करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close