तुमचं शिवबंधन, तर आमचं अटलबंधन !, भाजपचा नवा फंडा

August 15, 2016 10:58 AM0 commentsViews:

मुंबई, 15 ऑगस्ट : शिवसेनेच्या शिवबंधन धाग्याला पर्याय म्हणून भाजप कार्यकर्त्यांसाठी अटल बंधन आणण्यात येणार आहे. शिवसेनेत नव्यानं प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांच्या हातावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवबंधनाचा धागा बांधतात. आता भाजपमध्येही अशीच पद्धत सुरू केली जाणार आहे.atalbandhan

भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांच्या हातावर अटलबंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे. नव्यानं पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्यासाठी हा अटलबंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटलबंधनाचा धागा बांधण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलीये. मुंबईसह राज्यातील 9 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close