दीपा कर्माकरचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं

August 15, 2016 8:11 AM0 commentsViews:

dipa_karmarkar315 ऑगस्ट : भारताला स्वातंत्र्यदिनी पदक जिंकून देण्याचे दीपाचे स्वप्न चांगली उडी मारल्यानंतरही दुरावले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकरचे अंतिम फेरीत कांस्य पदक थोडक्यात हुकलं.

दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी 15.266 गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण दीपाच्या या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दीपाने पात्रता फेरीपेक्षा अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स प्रकारात दीपाने भारताची ओळख निर्माण करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close