महाराष्ट्राची कन्या ललिता बाबर ‘बेस्ट ऑफ लक’, आज फायनलचा थरार

August 15, 2016 12:30 PM0 commentsViews:

lalita315 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्सच्या ट्रॅकवर तिरंगा डौलानं फडकवत ठेवला आहे. आज होणार्‍या फायनलसाठी ललिता बाबर सज्ज झाली. फायनलमध्ये ललिताने पदक पटकविल्यास आजच्या 15 ऑगस्टच्या दिवशी रिओतही तिरंगा फडकणार आहे.

भारतीय वेळेनुसार आज रात्री 8.45 ला या स्पर्धेचा थरार टीव्हीवर पहायला मिळणार आहे. शनिवारी ललितानं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या फायनलमध्ये धडक मारली. ऑलिम्पिकची फायनल गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच ऍथलीट ठरली आहे. ललितानं प्राथमिक फेरीच्या दुसर्‍या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला. ललितानं जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close