मुंबई आणि दिल्लीचा सामना

April 13, 2010 9:36 AM0 commentsViews: 1

13 एप्रिलआयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स दरम्यान मॅच रंगेल. मुंबईनं याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे केवळ विजय कामगिरी कायम ठेवत मुंबईकरांना विजयाची आणखी एक भेट देण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल. मुंबईचा कॅप्टन सचिन तेंडुलकर जबरदस्त फॉर्मात आहे. सचिन टीमला एक हाती विजय मिळवून देतोय. पण इतर बॅट्समनना गेल्या काही मॅचमध्ये मोठा स्कोर करता आलेला नाही. दिल्लीसाठी मात्र ही मॅच करो या मरोची असणार आहे. 11 मॅचमध्ये 6 विजय मिळवत दिल्लीच्या खात्यात 12 पॉईंट्स जमा आहेत. त्यामुळे उरलेल्या तीन मॅचमध्ये दिल्लीला किमान दोन मॅचमध्ये विजय मिळवणार लागणार आहे. किंग्जविरुध्दच्या गेल्या मॅचमध्ये दिल्लीला मोठ्या फरकानं पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या मॅचमध्ये दिल्लीवर मोठं दडपण असणार आहे.आयपीएलमध्ये दुसरी मॅच असेल ती चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही टीमच्या खात्यात प्रत्येकी दहा पॉईंट्स आहेत. आणि सेमीफायनल प्रवेशासाठी दोन्ही टीमसाठी ही महत्वाची मॅच ठरणार आहे. दोन्ही टीममध्ये भक्कम खेळाडू असले तरी या स्पर्धेत त्यांची कामगिरी लौकीकाला साजेशी करता आलेली नाही. आणि यामुळेच सेमीफायनल प्रवेशासाठी त्यांना शेवटच्या मॅचपर्यंत वाट पहावी लागत आहे. चेन्नईच्या टीममध्ये मॅथ्यू हेडन, माईक हसी, सुरेश रैना, मुरली विजय आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी अशी भक्कम बॅटिंग ऑर्डर आहे. तर फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन, फास्ट डग बॉलिंगर असे भक्कम बॉलर आहेत. तरीही टीम समाधानकारक कामगिरी करु शकलेली नाही. नाईट रायडर्सचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. ख्रिस गेल, ब्रॅडन मॅक्युलम, सौरव गांगुली आणि ब्रॅड हॉज अशा भक्कम बॅट्सनच्या जोडीला अजित आगरकर, शेन बॉण्ड अशा भेदक बॉलर्सची साथ आहे. पण आता सेमीफायनल प्रवेशासाठी दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

close