स्वातंत्र्यदिनीच काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवानांसह 4 जखमी

August 15, 2016 1:20 PM0 commentsViews:

kashmir_attack15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवलाय. तिनसुकिया जिल्ह्यात उल्फा-इंडिपेंडेंट संघटनेच्या दहशतवाद्यांनी चार स्फोट घडवून आणले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या हल्ल्यात दोन सीआरपीएफच्या जवानांसह चार जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिनसुकियातील लैपुलीमधील इंदिरा गांधी शाळेजवळ सकाळी7.15 च्या सुमारास आईईडी स्फोट घडवण्यात आला. त्यानंतर डूमडूमा भागात बदलाभाटाच्या लाईन नंबर 6 मध्ये दुसरा स्फोट झाला. तर तिसरा स्फोट मसुवा भागात झाला. तर चौथा स्फोट हा फिलोबरीच्या गमतुमाटी भागात झाला. या भागात बाहबोन गावात उल्फा-आईच्या दहशतवाद्यांनी 12 ऑगस्ट रोजी रात्री गोळीबार करून दोन जणांची हत्या केली होती. या गोळीबारात सह जण जखमी झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close