सलाम मौजा गावाला, देशाला दिले 23 सैनिक !

August 15, 2016 3:47 PM0 commentsViews:

वाशिम, 15 ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यातील मौजा गावाने देशसेवेकरिता आतापर्यंत 23 सैनिक दिले आहेत. गावाची लोकसंख्या पाहता हा आकडा गावाची मान उंचावणारा आहे. मौजा या गावातील 23 जणांनी सैन्यदलात सहभागी होऊन देशसेवेत आपलं योगदान दिलंय.

गावातील उद्धव सरनाईक 1988 साली सैन्यदलात भरती झाले आणि 1996 मध्ये माओवाद्यासोबत संघर्ष करताना त्यांना 7 गोळ्या लागल्या त्यापैकी 6 गोळ्या काढण्यात यश आलं तर एक गोळी काढायला 20 वर्ष वाट पहावी लागली. याच गावातील कैलास सरनाईक या जवानाला बारामुल्ला भागात आतंकवाद्याशी संघर्ष करत असताना 2008 मध्ये वीरमरण आलं मात्र तरिही या गावातील अनेक तरूण सैन्यदलात कार्यरत आहेत.moja_washim

वाशीम जिल्ह्यातील मौजा या 1500 लोकवस्तीच्या गावात 23 सैनिक देश सेवेकरिता दिले आहे. त्यातील एक उद्धव सरनाईक यांनी सैन्य दलात 1988 मध्ये भरती झाली आणि 1996 मध्ये माओवाद्यांशी संघर्ष करत असताना उद्धव यांना 7 गोळ्या लागल्या त्या पैकी 6 गोळ्या काढण्यात यश आलंय. तर एक गोळी शरीरातून काढण्यास डॉक्टर अपयशी राहिले कारण ही गोळी हाडाच्या मधात होती. 2015 मध्ये दुचाकीचा अपघात झाला आणि गोळी लागलेल्या जागी हाड मोडले आणि 20 वर्षांनंतर गोळी शरीरातून बाहेर निघाली

गावातील कैलास सरनाईक या जवानाने तर बारामुल्ला भागात आतंकवाद्यांशी संघर्ष करत असताना 2008 मध्ये शहीद झाले असं असून ही गावातील युवक देश सेवेत प्रेरणा घेऊन आपलं आयुष झोकून देत आहे. या मौजा गावात ब्रिटीश राजवटीच्या काळात या गावातील 3 सैनिक ब्रिटीश सैनिक म्हणून ही होते. तर देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर देश सेवेत देण्यास हे गाव सक्षम असल्याच दाखवून देते इतर नोकरीच्या मागे न लागता या गावाची प्रेरणा घेत देशा करिता समोर येत आहे. गावाने देशासाठी केलेलं बलिदान हे इतर गांवांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close