मुंबईत होणार्‍या दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर गुप्तचार यंत्रणांची करडी नजर

August 15, 2016 9:59 PM0 commentsViews:

Dawood Ibrahim123

15 ऑगस्ट :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भाच्याचं लग्न 17 ऑगस्टला मुंबईमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमिवर त्याच्यावर सर्व गुप्तचर यंत्रणांचं लक्ष असणार आहे. दाऊद व्हिडिओ कॉन्फरंसींग किंवा स्काईपच्या माध्यमातून या लग्नात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. हसीना पारकरचा लहान मुलगा अलीशाह पारकरचं हे लग्न आहे. ज्याच्या लग्नाचं कार्ड आयबीएन लोकमतच्या हाती लागलं आहे. हसीना पारकरचा मृत्यू 2014 साली झाला. लग्नाच्या पत्रिकेनुसार 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता नागपाडाच्या तेली मोहल्लामध्ये अलीशाहचा लग्न आयेशा बरोबर होणार आहे. आयेशा शिराज नागानी नावाच्या एका व्यापार्‍याची ही मुलगी आहे. या लग्नात दाऊदचा भाऊ इकबाल कासकरही हजार राहणार आहे. ज्याच्यावर देखील बर्‍याच गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आता 17 ऑगस्टला गुप्तचार यंत्रणांना दाऊदचा पत्ता लागतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close