भारताच्या 70व्या स्वातंत्र्यदिनी उस्मानाबादमध्ये ‘जोडो भारत अभियाना’ला सुरुवात

August 15, 2016 4:04 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-08-15-22h11m23s199

15 ऑगस्ट :  भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावात सेवाग्राम संस्था आणि IBN लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जोडो भारत अभियानाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला जलपुरुष राजेंद्रसिंह, सेवाग्राम संस्थेचे विनायक पाटील, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे उपस्थित होते.

भारताचा तिरंगा ध्वज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्याहस्ते काश्मीरमधील जाहिद भट या विद्यार्थ्याच्या हातात सुपुर्द करत जोड़ो भारत अभियानाला सुरुवात झाली. याच अभियानाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय एकात्मतेची आणि अखंडतेची शपथ देण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close