वसई विरार महापालिकेची निवडणूक जाहीर

April 13, 2010 11:54 AM0 commentsViews: 3

13 एप्रिलवसई विरार महापालिकेच्या निवडणूक जाहीर झाली आहे. महापालिकेसाठी 30 मे रोजी मतदान आणि 31 मे रोजी होणार मतमोजणी होईल. वसई विरार महापालिकेतून 53 गावे वगळण्यात यावीत, या मागणीसाठी वसईकरांनी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली मोठी जनआंदोलन उभारले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. त्यानंतर सरकारने 35 गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा ठराव केलेली 8 गावे वगळावीत, यासाठी पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी कालच आमदार विवेक पंडित आणि 129 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. वसई कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नकार दिला आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक होणार आहे. विकासासाठी ही गावे महापालिकेत येणे गरजेचे आहे, असे आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर हरित वसईचा पुरस्कार करणार्‍या आमदार पंडित समर्थकांचा महापालिकेत सामील होण्यास विरोध आहे.

close