ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरू नका, सचिनचं भावनिक आवाहन

August 16, 2016 8:56 AM0 commentsViews:

ठाणे, 16 ऑगस्ट : जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही काळाजी गरज आहे नवीन पिढीने या गोल्डन जनरेशनचा सन्मान करावा, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या असं भावनिक आवाहन मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं केलं. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरून चालणार नाही आणि त्यांना विसरुन आपली प्रगती कधीही शक्य नाही असंही तो म्हणाला. ठाणे पोलिसांच्या वतीन ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली. 1090 असं या हेल्पलाईनचा क्रमांक आहे.sachin_4412

ठाणे पोलिसांच्या वतीने खास करून ज्येष्ठ नागरिकांच्या साठी एक नवीन हेल्पला इन सुरू करण्यात आली आहे. 1090 क्रमांकाच्या हेल्पलाईनमुळे भविष्यात ज्येष्ठ नागरिकंना याच उपयोग होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आले कर्तव्य नावाची ही हेल्पलाईन आहे. या वेळी सचिनचा आयोजकांनी सत्कार देखील केला.

जेष्ठ नागरिकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा सर्वात जास्त दुःख मला होतं, जेष्ठांचं मार्गदर्शन कधी विसरू शकत नाही,मोठ्यांचे आशीर्वाद नसतील तर आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही असं भाषणात सांगत असताना सचिन आई,आजी,वडील यांचं स्मरण करायला विसरलं नाही. तर आयुष्यात ज्यांनी स्वतंत्र दिलं त्यांना दुर्लक्ष करू नका असे देखील सांगितलं. खास करून त्याने हे सर्व भाषण मराठीत केले तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे लंडन येथे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असताना देखील ठाणे पोलिसांनी जेष्ठ नागरिकांच्या कर्तव्य या जनजागृती या उपक्रमाला हजेरी लावली.या हेल्पलाईनचं ज्येष्ठ नागरिकांनी देखील स्वागत केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close