सर्पोद्यान की सापांची दफनभूमी ?,बरण्यांमध्ये सापांना मरण यातना !

August 16, 2016 9:59 AM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 16 ऑगस्ट : सर्पोद्यानात सोडण्यात आलेल्या सापांचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सर्पोद्यानात सोडलेल्या बहुतांश सापांचा देखभालीअभावी मृत्यू झालाय. याला प्राणी संग्रहालयातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सर्पमित्रांनी केलाय.snek_pimpri

बोर्डावर प्राणीसंग्रहालय लिहलं असलं तरी ही सापांची दफनभूमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्पोद्यानात चक्क सापांना मरायला सोडलं जातंय. नागरीवस्तीतून पकडलेल्या किंवा गारुड्यांकडून जप्त केलेल्या सापांना पिंपरी चिंचवडच्या सर्पोद्यानात सोडण्यात येतं. मात्र इथं देण्यात आलेल्या सापांची प्रशासनाकडून कोणतीच देखभाल होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जखमी सापांवर इथं उपचार तर होत नाहीतच…सापांना हवाबंद बरण्यांमध्ये मरण्यासाठी सोडून देण्यात येतं.

सापांच्या देखभालीविषयी विचारलं असता महापालिकेचे अधिकारी सर्पमित्रांना उद्धट उत्तरं देतात. सापांच्या संवर्धनाच्या हेतुला हरताळ फासणारी हे सर्पोद्यानं बंद का ?, करत नाही असा संतप्त सवाल सर्पमित्र उपस्थित करतायेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close