केरळच्या पद्मनाभ मंदिरातून तब्बल 186 कोटींचं सोनं चोरीला

August 16, 2016 1:08 PM0 commentsViews:

keral16 ऑगस्ट : केरळमधील पद्मनाभ मंदिरातून तब्बल 186 कोटींचं सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. 186 कोटी रुपयांची 769 सोन्याची भांडी चोरीला गेली आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. या अपहारा मागे मंदिर प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येतोय.

ऑडिट करणार्‍या कमिटीने जवळपास 186 करोड रुपयांचे सोन गायब झाल्याचा खुलासा केलाय.माजी मुख्यमंत्री विनोद राय यांच्या अध्यक्ष खाली या समितीने हा खुलासा केलाय. या समितीच्या मते मंदिर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि पैशांच्या अपव्यवहार केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, 1000 पानी रिपोर्टमध्ये या समितीने हा खुलासा केलाय. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टांने माजी मुख्यमंत्री विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.186 करोड रुपयांचे 769 सोन्याची भाडी गायब झाल्याचे या समितीच्या ऑडीटमध्ये समोर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close