जय जवान !, 50 फूट उंच टॉवरवर पाकचा झेंडा उतरवून फडकावला तिरंगा

August 16, 2016 1:31 PM0 commentsViews:

श्रीनगर, 16 ऑगस्ट : दक्षिण काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी एका जवानाने जीवाची बाजी लावून तिरंगा फडकावला. मोबाईलच्या टॉवर चढून पाकिस्तानचा झेंडा उतरवून या बहाद्दुर जवानाने भारताचा तिरंगा फडकावला.

jamu_kashmir3जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने खात्मा केलेल्या दहशतवादी बुराहन वाणीच्या त्राल या गावी काही अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या स्वांतत्र्य दिनी एका मोबाईच्या टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा फडकवला होता. ही गोष्ट भारतीय जवानांना कळताच. ते त्या टॉवरजवळ पोहचले. कमांडिंग ऑफिसरची परवानगी घेऊन सचिन नावाच्या जवान टॉवरवर चढला. त्याने जीवाची परवा न करता पाकिस्तानी झेंडा उतरवून भारतीय झेंडा फडकवला. हा सगळा प्रकार ड्रोन कॅमेर्‍यात कैद करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close