पंडित अटक प्रकरणी हस्तक्षेपास नकार

April 13, 2010 12:20 PM0 commentsViews: 1

13 एप्रिलआमदार विवेक पंडित यांच्या अटक प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स, सुप्रीम कोर्ट आणि लोकसभा अध्यक्ष तसेच यापूर्वीच्या विधानसभा अध्यक्षांचा दाखला दिला आहे. त्यानुसार फौजदारी प्रकरणांमध्ये विधिमंडळ सदस्यांना विशेषाधिकार लागू होत नाही, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. विवेक पंडित यांच्या 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीबाबत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी औचित्याचा मुद्दा मांडला होता. यावर दिलीप वळसे पाटील यांनी हा ऐतिहासिक निर्वाळा दिला आहे. ठाण्यात आंदोलनदरम्यान विवेक पंडित यांच्या सुटकेसाठी ठाण्यात श्रमजीवी संघटनेने जेलभरो आंदोलन केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या 300 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close