पाकिस्तानमध्ये जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखंच – पर्रिकर

August 16, 2016 4:11 PM0 commentsViews:

parrikar

16 ऑगस्ट : पाकिस्तानमध्ये जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखंच असल्याची बोचरी टीका भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे.

भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी सिमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज येथे एका कार्यक्रमात बोलताना पर्रिकर यांनी तीव्र संताप व्यक्त केली.

‘पाकिस्तानात जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखंच आहे. दहशतवादाला आश्रय देण्याचे परिणाम आज पाकला भोगावं लागत आहेत. भारताशी समोरासमोर लढण्याची हिम्मत नसल्यानेच ते सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून हे असे छोटे मोठे कुरापची काढत आहेत’, अशा शब्दांत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पाकिस्तानवर हल्ला चढवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close