अमरावती : नरबळीच्या उद्देशाने 11 वर्षांच्या मुलावर ब्लेडने केला वार

August 16, 2016 5:44 PM0 commentsViews:

Narbali21321

16 ऑगस्ट : अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा इथल्या 11 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रथमेश सगणे असं या मुलाचं नाव आहे. दिव्यशक्ती प्राप्त करण्यासाठी आरोपींनी प्रथमेश सगणे नावाच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शंकर महाराज संचालित प्राथमिक शाळेत प्रथमेश सगणे पाचवी इयत्तेत शिकतो. तसंच याच शाळेच्या वसतिगृहात राहतो. या वसतिगृहात आचारी म्हणून काम करणारे निलेश जानराव उके आणि सुरेंद्र मराठे हे प्रथमेशवर लक्ष ठेवून होते. अघोरी कृत्याची पुस्तकं वाचून हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्या प्रथमेशला नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close