ओबीसी जनगणनेसाठी याचिका

April 13, 2010 12:28 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास गटांप्रमाणेच ओबीसींचीही जनगणना व्हावी, यासाठी समता परिषदेचे कार्यकर्ते किशोर कान्हेरे यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या जनगणनेप्रमाणे ओबीसींची जगनणना व्हावी, असे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान या जनगणनेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारणा केली आहे. त्यावर कोर्टाला तीन आठवड्यात उत्तर देण्याचे सरकारने कबूल केले आहे.

close