डॉक्टर पोळची पोलीस अधिकार्‍यांमध्ये होती दहशत?

August 16, 2016 6:59 PM0 commentsViews:

Santoshh poll

16 ऑगस्ट : वाईचा डॉक्टर संतोष पोळ याची पोलिस अधिकार्‍यांमध्ये दहशत होती, अशी माहितीही समोर येत आहे. एसीबीतल्या ओळखीचा संतोषकडून अनेकवेळा गैरपावर करण्यात आल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी सांगीतलं. एसीबीमधल्या ओळखीचा फायदा तो पोलिसांवर दबाव आणण्यासाठी करत असल्याचंही समोर आलं आहे. संतोष पोळ हा एसीबीचा खबर्‍या म्हणूनही काम करत होता. त्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणला का याचीही चौकशी करण्यात येणार आहे. आरोपी संतोष पोळ हा पोलिसांच्या रडारवर होता असंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, संतोष पोळनं बेबी पाटणकर ड्रग्ज केससह तब्बल 12 एसीबी ट्रॅपसाठी एसीबीला टिप दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर मुंबईचे तत्कालीन एसीबी प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनाही तो अनेकदा भेटल्याची धक्कादायक माहिती एसीबीच्या खास सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. एसीबीचे माजी प्रमुख प्रवीण दीक्षित यांनाही संतोष पोळ भेटल्याची माहिती मिळतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close