धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाऊडस्पीकरची गरज नाही – हायकोर्ट

August 16, 2016 8:58 PM0 commentsViews:

Loudspecker231

16 ऑगस्ट :  नागरिकांना धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं असलं तरी त्यासाठी लाऊडस्पीकर वापरायची गरज नाही, असं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. यासंबंधी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टानं धार्मिक कारणाच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करता येणार नाही असं स्पष्टपणे नागरिकांना बजावलं.

सायलेन्स झोनमध्ये रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही असं हायकोर्टानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, रिक्षा स्टँडच्या आसपासच्या परिसरात रस्त्यावर मंडप उभारण्याची परवानगी सरकारने देऊ नये असंही मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

रस्त्यावर मंडप उभारण्यात येताना त्यानं रहदारीवर अडथळा निर्माण होणार नाही, तसंच लाऊडस्पीकरची परवानगी देताना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी संबंधित महापालिकांनी घ्यावी असा आदेशही कोर्टाने दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close