18 वर्षांखालील गोविंदा, 20 फुटांपेक्षा उंच मनोरे नको – सुप्रीम कोर्ट

August 17, 2016 3:48 PM0 commentsViews:

dahi handhi news

17 ऑगस्ट :  महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसावी हा मुंबई सुप्रीम कोने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टने कायम ठेवला आहे. तसेच, 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये असे देखील सुप्रीम कोर्टने बजावले आहे.

सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयामुळे अनेक दहीहंडी आयोजक नाराज झाले आहेत. या निर्णयामुळे मुंबईची ओळख असलेली अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 20 फूट म्हणजे केवळ चार थर, तेव्हा अशी दहीहंडी फोडण्यात गोविंदांना देखील उत्साह वाटणार नाही तेव्हा अशी दहीहंडी खेळली नाही तरी काही हरकत नाही असं म्हणत आव्हाड यांनी आपण यावर्षी दहीहंडी सोहळा आयोजित करणार नसल्याचे जाहीर केले..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close